Showing posts with label झटपट पैसे. Show all posts
Showing posts with label झटपट पैसे. Show all posts

सरोगसीसाठी भारतीय स्त्रिया आघाडीवर!

मुंबई : अप्रजननक्षम जोडप्यांसाठी भारत हे आवडत ठिकाण झालंय. कारण आहे, सरोगसी गर्भ उपलब्ध करणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत भारतात झालेली वाढ आहे. सरोगसीमध्ये मिळणाऱ्या झटपट पैश्यांमुळे यासाठी स्त्रियाही पुढे येत आहेत,असं तज्ञांच मत आहे. पण कायद्यातील त्रुटीमूळे प्रजनन आणि सेरोगसी केंद्र ह्या संधीचा फायदा उठवत आहेत. झटपट पैसे मिळत असले तरी, सरोगसीचे काही धोके ही आहेत. सरोगसित स्त्रियांना देण्यात येणाऱ्या संप्रेरकांच्या इंजेक्शन्समूळे, स्त्रियांमध्ये ओव्हेरियन हायपरस्टीम्युलेशन सिंड्रोमचा धोका ही वाढतोय, असं डॉक्टर सांगतात. त्यामुळे रक्ताच्या गाठी होणे आणि किडनी फेल्युअर असे रोग होऊ शकतात. 

सरोगसी करणाऱ्यांना शारीरिक अंगगुणांवरून ४०.००० ते १.५ लाख दरम्यान पैसे मिळतात. सरोगसीसाठी गौर वर्ण, घारे डोळे, उच्च जात असणाऱ्या स्त्रियांना जास्त मागणी आहे. तसच वकील आणि व्यवस्थापन पदवीधर अश्या सुशिक्षित स्त्रियांना ही मागणी असते. असं सरोगसीसंबंधी पोर्टल चालवणाऱ्या संस्थापकाने सांगितलं. हे पोर्टल अप्रजननक्षम जोडप्यांना सरोगेट मातांना शोधण्यात मदत करते. या पोर्टलने २०११ वर्षात ३५ सरोगसीमातांची सोय करून दिली आणि यावर्षी त्यांनी २० अप्रजननक्षम जोडप्यांना मदत केली असून, अशी अजून २० त्यांच्या मदतीने होण्याची शक्यता आहे.
कुलाबा येथील एका प्रजनन केंद्राने आपल्या येथील सरोगसीची संख्या ही गेल्या सहा महिन्यात १० वरून २० एवढी वाढ झाल्याच सांगितलं.”सरोगसीविषयी वाढलेल्या जागरूकतेचा हा परिणाम आहे.” असं या केंद्राच्या डॉक्टर्सच म्हणण आहे.
पुरुषांमधील बीजदान विषयावर काही महिन्यांपूर्वी ‘विकी डोनर’ नावाचा सिनेमा ही आला होता. बॉलीवूड चित्रपटामूळे समाजात नक्कीच जागरूकता निर्माण होत असते, असं दिसून येत. मात्र असं असलं तरी, बीजदान आणि सरोगसीसंबंधातील कायद्यातील त्रुटी दूर करून ते योग्यरित्या लागू केले पाहिजेत. तरच बीजदान आणि सरोगेट मातांना योग्य फीज आणि अप्रजननक्षम जोडप्यांना योग्य बीजदाते मिळू शकतील.
(स्त्रोत : जय महाराष्ट्र न्यूज)