हिंदुस्थानच्या संस्कृतीतच नव्हे; तर जगातील सर्वच संस्कृतीमध्ये वांझ स्त्रीला कुठल्या ना कुठल्या प्रकारे हेटाळण्यात येते. आलेलं आहे. माता होण्याची आस जशी नैसर्गिक होती, तशीच ती सामाजिकही आहे. `टेस्ट टय़ुब बेबी'च्या शोधापर्यंत बाळ होण्यासाठी आसुसलेल्या भगिनींना आणि जोडप्यांना नवस सायासाबरोबरच अनेक अघोरी उपायांना सामोरं जावं लागायचं. देव-देवस्कीपासून ते बुवा-अम्मांपर्यंत भले भले शरण जायचे.
एखादी भगिनी कितीही सोज्वळ, प्रेमळ असो; पण वांझ म्हणून तिला दोषी धरलं जायचं. विज्ञानाच्या प्रगतीबरोबर मूल कसं होतं याचा उलगडा झाला. मुलं होणार्या त्रीला फक्त मुलीच होतात म्हणून जो काच असायचा व आहे, तो वेगळाच. मुलगा व मुलगी होण्यास जबाबदार संबंधित पुरुष असतो याचा उलगडा करणारं जैवविज्ञान विकसित झालं, तरी कळते पुरुषही आपल्यात दोष नसल्याचं मानतात. आजही जैवविज्ञान त्याही पुढं गेलंय. `टेस्ट टय़ुब बेबी' आज इतिहास झालाय. तर आज तेच तंत्रज्ञान आयव्ही-एफच्या पुढे एक पायरी सरकलंय. तरीही पुरुषी मानसिकतेने अजूनही डोळ्यांवर कातडं ओढून घेतलेलं आहे. ज्या जोडप्यांना मूल होत नाही; पण मूल हवंय किंवा एखाद्या त्रीला मूल हवंय, पण गरोदरपणा जोखमीचा वाटतो अशा त्रियांसाठी `सरोगसी' हा मार्ग सोयीचा वाटतो. अंदाजे गेल्या दहा वर्षांपासून भारतातही `सरोगेट मदर' अर्थात मातृत्व भाडय़ाने देण्याची पद्धत सुरू झाली आणि आज तिने भारतातील काही प्रदेशांमध्ये व्यवसाय म्हणून मूळ धरल्याचे जाणकार सांगतात.
आपल्या देशात आजघडीला वर्षाकाठी अशा पद्धतीने 30-35 हजार बालकं जन्माला येतात. आणि त्यातही बरीचशी परदेशी जोडप्यांची असतात. यातील एखादी भाडोत्री माता दगावली किंवा काही वैद्यकीय समस्या निर्माण झाली तरंच त्याबद्दल माध्यमांमधून चर्चा होते. इतरवेळी ही `सेवा' बिनबोभाट सुरू आहे. या व्यवसायात मुबलक पैसा सुटत असल्याने दलालनामक संस्था यातही कार्यरत आहे. आई-बाप होण्यासाठी आसुसलेले, गरजवंत लोक अशा दलालांशी संपर्क साधतात. मूल होण्यासाठीचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरल्यावर वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेली मंडळी हा एक उपाय सुचवितात. हा उपाय खर्चिक असला, तरी तो आई-बाबा होऊ इच्छिणारांसाठी निर्धोक असतो. अशा गरजवंत आई-बाबांसाठी भाडोत्री माता किंवा आपले गर्भाशय भाडय़ाने देणारी त्री दलाल शोधतात. अशा भाडोत्री माता गरीब वस्त्यांमध्ये, मध्यमवर्गीयांमध्ये मिळतात. यापैकी बहुतेक त्रियांचे नवरे काम करीत नाहीत. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आणि यातून एक रकमी पैसा मिळणार असल्याने काही त्रियांना त्यांचा नवरा, सासू, सासरे सरोगसी करण्यासाठी दबाव आणतात. त्यासाठी त्यांना किती पैसा मिळतो याचा नक्की आकडा कळत नाही. पण, वैद्यकीय क्षेत्र आणि दलाल यांना यातील मोठा हिस्सा दिला जातो, असं मानलं जातं.
सरोगसीकरणींच्या आरोग्याचं काय?
गर्भाशय भाडय़ाने दिल्याने सदर महिलेस काही त्रास वगैरे होत नाहीत असा काहीसा प्रवास समाजात आहे. पण एरव्ही कुठल्याही गरोदर त्रीस गरोदरपणातला त्रास सहन करावा लागतो. तो यांनाही होतो. शिसारी, डोहाळे, डिप्रेशन, मानसिक त्रास या त्रियांनाही होतात. फरक एवढाच असतो की होणार्या बाळाची जैविक माता ही नसते. बाळ जन्मल्यावर ते त्याच्या मूळ आई-वडिलांच्या ताब्यात जाईपर्यंतच्या काळात संबंधित त्रीला तो नऊ महिने पोटात वाढवलेला गोळा इतक्यात कुणाला तरी तोडून देताना मानसिक त्रास होत नसेल असं कुठल्या निकषावर म्हणता येईल? अशा सरोगेट मातांच्या आरोग्याची दीर्घकालीन हमी कुणीही घेतलेली दिसत नाही. `भाडय़ाचं घर आणि खाली कर' इतकं ते सोपं नसावं.
इंग्लंडच्या एका प्रातिनिधीक उदाहरणावरून सरोगसीच्या व्यवसायात किती आर्थिक उलाढाल असेल याची एक अटकळ बांधता येऊ शकेल. इंग्लंडमध्ये एक महत्त्वाचे म्हणजे कायद्याने विवाहित त्रीलाच सरोगसी करता येते. इंग्लंडमध्ये जिल हो किन्स नामक सामाजिक कार्यकर्ती म्हणवून घेणारी त्री आहे.
जिला स्वतःचं मूल नाही; पण तिने आजपर्यंत नऊ वेळा सरोगसी करून दहा बाळांना जन्म दिलाय. (एक जुळं). सदर भगिनीचं म्हणणं आहे की, बाळासाठी आसुसलेल्या मातांना आनंद मिळावा म्हणून मी ही, समाजसेवा करतेय. गरोदरपणात तिला ज्या यातना, वेदना सहन कराव्या लागतात त्यासाठी ती फक्त बारा हजार पौंड अर्थात भारतीय चलनात सुमारे किंवा अंदाजे साडेआठ लाख रुपये घेते. अर्थात, या जिल भगिनीचे हे प्रातिनिधीक आणि अव्यावसायिकतेतील म्हणणं असेल, तर भारतासारख्या वैद्यकीय सेवा स्वस्त असलेल्या देशात, जिथं काहीही विकायची मानसिकता वाढली जात असलेल्या देशात वैद्यकीय क्षेत्रातील लोक आणि त्यांचे दलाल किती पैसे कमावत असतील याची अटकळ सुज्ञ बांधू शकतात. सरोगसी भारतात कायदेशीर केली तर काय होईल याबद्दलचे कयास वाचकांनी करावेत. नो कॉमेंट्स!
- शाहू पाटोळे,
साभार : दै. कृषीवल
Urgent need Female for (egg donation) /(kidney donors) with the sum of $500,000.00,whatsapp +91 9945317569
ReplyDeleteEmail: jainhospitalcare@gmail.com