नवी दिल्ली: समलैंगिक संबंधांना मान्यता देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाप्रमाणेच सर्वोच्च न्यायालयानेही समलैंगिक संबंध अनैसर्गिक कसे असा सवाल करत, न्यायमूर्ती जी. एस. सिंघवी आणि एस. जे. मुखोपाध्याय यांच्या खंडपीठाने 'सरोगेट मदर' आणि 'टेस्ट ट्यूब बेबी' हे प्रकार तरी नैसर्गिक आहेत काय, अशी विचारणा केली आहे.
तसेच सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकता म्हणजे काय, ते निसर्गाच्या विरोधात आहे, हे कोणत्या तज्ज्ञांनी स्पष्ट करून सांगायचे अशी विचारणा ही केली आहे. सर्वोच्च न्यायालयात समलैंगिक संबंधांना विरोध करणाऱ्या आयोगाची बाजू ज्येष्ठ वकील अमरेंद्र सरन मांडत आहेत.