सरोगसीच्या क्षेत्रात जगात भारताचा बोलबाला

भारतात गेल्या काही काळात वैद्यकीयशास्त्राच्या आधुनिक विकासाबरोबर सरोगसीच्या क्षेत्रातही जबरदस्त विकास झाला आहे. भारतात सरोगेट माता मिळविणे पश्चिमेच्या देशांपेक्षा जास्त सुकर आणि स्वस्त आहे. पश्चिमी देशांमध्ये सरोगसीसंबंधातील कायदे खूपच कडक आहेत; तर भारतात अजून या क्षेत्रात कडक कायदे झालेले नसल्यामुळे इथे सरोगसीबाबतीत अधिकतर कायदेशीर अडचणी येत नाहीत. या परिस्थितीत सरोगसीच्या उपचारासाठी अधिकाधिक विदेशी भारतात येत आहेत आणि या क्षेत्रात उपचारासाठी भारताने जागतिक स्तरावर मोठी प्रसिद्धीही मिळविली आहे.

या उपचाराच्या खर्चाची बाब म्हटली तर भारतात सरोगसीसाठी येणाऱया दांपत्याला सरोगेट मातेला एक लाख ते साडेतीन लाख रूपये देण्याची तयारी ठेवावी लागते. सरोगेटची ही फी प्रत्येक केंद्राप्रमाणे वेगवेगळी असते; कारण यासाठी कोणताही विशेष कायदा नाही. सरोगेटसाठी उत्तम निरोगी प्रकृतीची आणि निरोगी मूल असलेल्या विवाहीत स्त्रीची निवड करण्यात येते. त्याचबरोबर ही सरोगेट संपूर्ण सरोगसीच्या प्रक्रियेला योग्य प्रकारे समजू शकेल अशी समजूतदार असणेही खूप गरजेचे आहे.

सरोगसीच्या संपूर्ण प्रक्रियेत इन विट्रो फर्टिलायझेशन तंत्राचा अवलंब करण्यात येतो. याच्या एका सायकलमागे सुमारे सत्तर हजार रूपये खर्च करण्याची तयारी ठेवावी लागते.सरोगेटला द्याव्या लागणाऱया अन्य सुविधांची बाब म्हटली तर अंड अन्य भारतीय स्त्रीकडून घेतले गेले तर अंडदाता स्त्रीला चार अंड्यासाठी दीड ते दोन लाख रूपये द्यावे लागतात. याशिवाय जर अंडदाती अमेरिका, ब्रिटन वा रशियाची नागरिक असेल तर त्याहून दुप्पट रक्कमही खर्च करण्यास तयार राहावे लागते. सरोगेट मातेच्या गर्भात जुळे असेल तर सिझेरियन आणि अन्य जटिल समस्यांसाठी आणखी दीडेक लाख रूपये खर्च करण्याची तयारी ठेवावी लागते. याशिवाय सरोगेटला दर महिन्यास औषधे आणि पौष्टिक आहारापोटी दोन ते तीन हजार रूपये द्यावे लागतात. कित्येकदा सरोगेट स्पा पॅकेज आणि लहानमोठ्या टूरच्या खर्चाचीही मागणी करते.

भारतात सरोगसी संबंधात खास कडक कायदे नसल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी त्याकरितांच्या नियमांमध्ये विसंगती पाहवयास मिळते. आता उशीरा का होईना सरकारला जाग आली आहे. `असिस्टेड रिप्रॉडक्टीव्ह टेक्नॉलॉजी बिल्स आणि रुल्स'चे विधेयक संसदेत सादर करण्यात येणार आहे. जागतिक पातळीवर भारताची गणना स्वस्त आयव्हीएफ सुविधांचे केंद्र म्हणून होते; पण एकदा का हे विधेयक सादर झाल्यानंतर या क्षेत्रातील प्रत्येक हालचाल सरकारच्या नजरेखाली येईल. भारतात सरोगसी क्षेत्राच्या प्रगतीत स्वस्त सुविधांचा खूप मोठा वाटा आहे. ज्या व्यक्तिला अमेरिकेत सरोगसीची सुविधा पाहिजे असेल तर त्याला 65 लाखाहून जास्त रक्कम खर्च करण्याची तयारी ठेवावी लागते; पण भारतात हेच काम लहानमोठ्या पाचशे क्लिनिक्समधून चार ते पाच लाख रूपयांमध्ये होते.

भारतात उपलब्ध सरोगसीच्या सुविधांचा लाभ अनेक विदेशी भारतीय घेतात. एका फर्टिलिटी निष्णाताच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडील एकूण रुग्णांपैकी 64 टक्के रुग्ण भारतीय आहेत आणि त्यातील 37 टक्के एनआरआय आहेत. भारतात सरोगसीचा बाजार 2000 कोटी रूपयांचा आहे आणि यामुळेच सरोगेटला अधिकतम फायदा मिळेल तसेच बाळजन्म जास्त सुलभ आणि स्वस्त होण्यासाठी सरकार विशेष कायदा करण्याची तजवीज करीत आहे.
संदर्भ : http://www.zagmag.net/index.php/baudhik/surrogates.html 

1 comment:

  1. Urgent need Female for (egg donation) /(kidney donors) with the sum of $500,000.00,whatsapp +91 9945317569
    Email: jainhospitalcare@gmail.com

    ReplyDelete